साठे कुळाविषयी

मागोवा आपल्या कुलपुरस्कृत न्यासाचा
आपला साठे ट्रस्ट सुरु होऊन ७५ वर्षे होऊन गेली. विधीवत शासन मान्यता मिळून याला ५२ वर्षे झाली. पुण्यात आपली स्वत:ची वास्तू आहे. ब्राह्मण समाजात त्यातही चित्पावन आडनावांचे कुलात आपण एकमेव होतो, ज्यांची स्वत:ची वास्तू व अनेक वर्षांचे कामकाज सुरु होते. आता अलीकडच्या १०-१५ वर्षात बऱ्याच आडनावांच्या स्वतःच्या जागा झाल्या. गत २० वर्षात त्यांचे कुलासाठी कामही सुरु झाले. अर्थात ती काळाची गरज होती. तसे घडले त्याचा आपणा सर्वांस आनंद वाटतो.

सन १९१४ मध्ये कै. हरि नारायण आपटे यांनी लोकमान्य टिळकांच्या अनुज्ञेने त्यांच्या कुलाचा पहिला कुलवृत्तांत प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या २५ वर्षात २-३ आडनावांचे कुलवृत्तांत झाले. त्यात आपल्या साठे साठये साठ्ये गोंधळेकर गोवंडे धारु या कुटुंबियांचाही वरचा क्रमांक आहे. १९३५ मध्ये कुलवृत्तांताचे कामास प्रारंभ करुन सन १९४० मध्ये आपला पहिला खंड प्रकाशित झाला. १०९० पृष्ठांचा ५.० इंच « ७.६ इंच आकाराच्या या ग्रंथाची किंमत तेव्हा साडेतीन रुपये होती. सवलतीत तो अडीचला मिळत असे. यामध्ये ५४०० व्यक्तींची त्रोटक माहिती नमूद करण्यात आली. अगदी शून्यातूनच याची सुरुवात झाली होती. म्हणूनच सतत ५ वर्षे पर्यंत हे अवघड काम सुमारे ९० व्यक्तींनी कै. धोंडो कृष्णाजी तथा धोंडूमामा साठे (रा. पुणे - त्यावेळचे सामाजिक कार्यकर्ते, म्युनिसिपल मेंबर व बँक ऑफ महाराष्ट्राचे संस्थापक) यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने तडीस नेले. पुढे दुसरा खंड ८०० पृष्ठांचा थोड्या मोठ्या आकाराचा व १० रुपये मूल्य असलेला सन १९६४ मध्ये प्रकाशित झाला. त्यात ७००० व्यक्तींची नोंद आढळते.

border-separator

साठे ई - कुलवृत्तांत फॉर्म

Note: Website is under development. During the process some data may be lost or some mismatched information might get displayed.